प्रवेश

2026-27 साठी प्रवेश सुरू

चार सोप्या टप्प्यांत प्रवेश

ऑनलाइन अर्ज भरा, प्रिंट काढा आणि शाळेच्या कार्यालयात या — रांग नाही, गोंधळ नाही.

ऑनलाइन अर्ज भरा

विद्यार्थी व पालकांची माहिती भरा. अर्ज क्रमांक लगेच मिळेल.

अर्जाची प्रिंट काढा

भरलेला अर्ज डाउनलोड/प्रिंट करा. तो कधीही पुन्हा प्रिंट करता येतो.

कागदपत्र पडताळणी

प्रिंट केलेला अर्ज व मूळ कागदपत्रांसह शाळेच्या कार्यालयात या.

शुल्क भरा व प्रवेश निश्चित करा

लेखा विभागात प्रवेश शुल्क भरून पावती घ्या.

आवश्यक कागदपत्रे

  • जन्म दाखला
  • विद्यार्थ्याचे आधार कार्ड
  • शाळा सोडल्याचा दाखला (दुसरीपासून पुढे)
  • मागील वर्षाचे गुणपत्रक
  • २ पासपोर्ट आकाराचे फोटो
  • जातीचा दाखला (लागू असल्यास)
  • रहिवासी पुरावा
  • उत्पन्नाचा दाखला (सवलतीसाठी)

शाळेच्या कार्यालयात पडताळणीसाठी मूळ जन्म दाखला, आधार कार्ड व मागील शाळेचा दाखला सोबत आणावा.

वयोमर्यादा

इयत्ताकिमान वय
नर्सरी (शिशुवर्ग)3 वर्षे
लहान गट (ज्यु. के.जी.)4 वर्षे
मोठा गट (सि. के.जी.)5 वर्षे
इयत्ता पहिली6 वर्षे

महाराष्ट्र शासनाच्या निकषांनुसार वय 31/12/2026 रोजी गणले जाते.

आरटीई २५% कोट्यातील प्रवेश केवळ शासनाच्या ऑनलाइन सोडतीद्वारे होतात. निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी वाटप पत्रासह कार्यालयाशी संपर्क साधावा.