गोपनीयता धोरण
शिवाजी कॉलेज, हिंगोली (शाळा) आपल्या वेबसाइट व मोबाइल ॲपमध्ये माहिती कशी गोळा करते व वापरते हे या धोरणात सांगितले आहे. ॲप शाळेकडून फक्त विद्यार्थी, पालक व कर्मचाऱ्यांसाठी चालवले जाते.
शाळा महाराष्ट्र शिक्षण नियमांनुसार विद्यार्थ्यांच्या नोंदी (नाव, पालकांची नावे, जन्मतारीख, पत्ता, संपर्क, आधार / सरल / PEN / APAAR, आवश्यक तेथे जात व प्रवर्ग, फोटो, वर्ग, निकाल व शुल्क) ठेवते. ही माहिती प्रवेश, जनरल रजिस्टर, शुल्क, दाखले, ऑनलाइन चाचण्या व शासकीय पोर्टलसाठी वापरली जाते. माहिती विकली जात नाही व जाहिराती दाखवल्या जात नाहीत. कायद्याने आवश्यक तेथेच शासकीय शिक्षण विभागांना माहिती दिली जाते.
माहिती दुरुस्त करण्यासाठी किंवा ॲप खाते हटवण्यासाठी शाळा कार्यालयाशी संपर्क करा: 7020566733 · ABAMOLBHALERAO@GMAIL.COM